चिखली प्रतिनिधी :-
महिलांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) मोफत लसीकरण मोहिमेचे मूळ बीजारोपण चिखलीत झाले, ही बाब विशेष महत्वाची ठरते.
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी मागील पाच वर्षांपासून मोफत HPV लसीकरण मोहिम राबवून महिलांच्या आरोग्य सुरक्षेबाबत एक अनुकरणीय उपक्रम उभारला. या उपक्रमाचा प्रभाव इतका व्यापक होता की, आज जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेली १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठीची जिल्हास्तरीय मोफत HPV लसीकरण मोहीम ही प्रत्यक्षात चिखलीत सुरू झालेल्या प्रयत्नांचीच पुढची पायरी ठरली आहे.
CSR फंडच्या माध्यमातून हजारो महिलांना मोफत लस
आमदार श्वेता महाले यांनी CSR फंडाचा प्रभावी वापर करून चिखलीतील हजारो मातांना मोफत HPV लस उपलब्ध करून दिली.
महिलांचे मार्गदर्शन
आरोग्यविषयी जागरूकता
मोफत लसीकरण
या तीनही पातळ्यांवर त्यांच्या नेतृत्वाने परिसरात आरोग्य संवेदनशीलता वाढवली.
नितीन गडकरी यांचे कौतुक
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी या उपक्रमाचे सार्वजनिक कौतुक केले होते. त्यांनी भविष्यातही अशा महिला आरोग्यविषयक योजनांना पाठबळ देण्याचे आश्वासन दिल्यामुळे या मोहिमेला अधिक बळ मिळाले.
आता जिल्हाभरात मुलींसाठी मोफत लसीकरण
जिल्हाभरातील मुलींना या जीवघेण्या आजारापासून संरक्षण मिळावे यासाठी :
ग्रामीण व शहरी शाळांमध्ये
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये
ग्रामीण व जिल्हा रुग्णालयांमध्ये
HPV लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच, लसीकरण मोहिम सुरळीत पार पाडण्यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. चिखलीची संकल्पना — जिल्ह्याचा आरोग्यदूत उपक्रम
महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी सुरू झालेला हा महत्वाचा उपक्रम म्हणजे —
चिखलीची संकल्पना
श्वेता महाले यांची दूरदृष्टी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन
या तिघांच्या संगमातून उभा राहिलेला एक लोकहितकारी आरोग्य मॉडेल आहे.
‘आरोग्यदायी माता — सशक्त समाज’
HPV लसीकरण मोहिमेचा जिल्हाभर विस्तार झाल्याने भविष्यात ‘आरोग्यदायी माता — सशक्त समाज’ निर्माण करण्यास हा उपक्रम निश्चितच मोलाची चालना देणार आहे.
Users Today : 18