नगराध्यक्ष पदासाठी अजय उमाळकर यांचा महायुतीकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल

Khozmaster
1 Min Read

मेहकर प्रतिनिधी ;-

नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून नगराध्यक्ष पदासाठी महायुतीतर्फे शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे अजय अरविंद उमाळकर यांनी आज दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज स्वीकृतीच्या प्रक्रियेच्या सुरुवातीपासून दाखल झालेला हा पहिलाच अर्ज ठरला आहे.
११ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत उमाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. महायुतीतील घटक पक्षांशी तसेच स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती प्रतापराव जाधव यांनी दिली होती.
गेल्या तीन दिवसांपासून निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपालिका मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या कार्यालयात एकही अर्ज दाखल झाला नव्हता. आज गुरुवारचा शुभ मुहूर्त साधत गजानन महाराजांचे निस्सीम भक्त असलेल्या अजय उमाळकर यांनी अर्ज दाखल करत निवडणूक प्रक्रियेला वेग आला.
अर्ज दाखल करताना अंजलीताई उमाळकर, युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, शहरप्रमुख जयचंद बाठी, रविराज रहाटे, जितूभाऊ सावजी, घनश्याम पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
अजय उमाळकर हे यापूर्वी मेहकर नगरपालिकेचे उपाध्यक्ष राहिले असून सध्या महाराष्ट्र अर्बन पतसंस्थेचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *