बुलडाणा प्रतिनिधी :-
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १० नोव्हेंबर २०२५ पासून नामनिर्देशन दाखल प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रारंभीच्या काही दिवसांतच जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांमध्ये अध्यक्ष पदासाठी ५ तर सदस्य पदासाठी ३३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.
जिल्ह्यातील नगरपरिषदवार नामनिर्देशनांची संख्या पुढीलप्रमाणे —
बुलढाणा – सदस्यासाठी ३
चिखली – अध्यक्षासाठी १, सदस्यासाठी ८
लोणार – अध्यक्षासाठी १
मलकापूर – सदस्यासाठी ६
मेहकर – अध्यक्षासाठी २, सदस्यासाठी ८
नांदुरा – अध्यक्षासाठी १, सदस्यासाठी १
शेगाव – सदस्यासाठी ६
सिंदखेड राजा – सदस्यासाठी १
Users Today : 18