मोताळा तालुका कोथळी ;-
मोताळा तालुक्यातील ग्राम कोथळी येथे अलीकडे घडलेल्या दुःखद घटनांमुळे तीन कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. आज या तिन्ही कुटुंबांना वैयक्तिकरित्या भेट देऊन त्यांचे सांत्वन करत त्यांच्या दुःखात मी सहभागी झालो. गावातील अनेक घरांवर अचानक कोसळलेल्या या मोठ्या आघातानंतर त्यांना मानसिक आधार देणे ही माझी जबाबदारी असल्याचे मी सांगितले. सांत्वन भेटी दरम्यान :-
* स्व. पुष्पाताई सपकाळ यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराशी संवाद साधून आधार दिला.
* स्व. लीलाबाई मनोहर पाटील यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या घरातील सर्वांना धीर दिला.
* स्व. लीलाबाई पाटील यांच्या निधनानंतर कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी जपलेल्या आठवणींचा आधार घेऊन पुढे जाण्याचा संदेश दिला.
मी सर्वांना सांगितले की,
“दुःखाच्या काळात तुम्ही एकटे नाही. तुमच्या सोबत मी आहे… आणि आपली शिवसेना ठामपणे उभी आहे.”
ही भेट औपचारिकतेपुरती नसून मनापासून केलेला मानवी संवाद होता. कुटुंबीयांनीही मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी शिवसेना नेते बाळासाहेब नारखेडे, प्रभाकर पाटील, ज्ञानेश्वर वाघ, मनोहर सातव, तसेच दिवंगतांच्या कुटुंबीयांसह शिवसैनिक उपस्थित होते.
Users Today : 18