सिंदखेड राजा मतदारसंघात डॉ. शशिकांत खेडेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

KHOZ MASTER
1 Min Read

सिंदखेड राजा |

सिनगाव जिल्हा परिषद सर्कलचे युवा नेते ओम पहाड यांच्या पुढाकारातून सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. शशिकांत खेडेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ओम पहाड यांनी डॉ. खेडेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व प्रतिमा देऊन सत्कार केला.

या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. उषाताई खेडेकर, श्रीनिवास खेडेकर, डॉ. भाग्यश्रीताई खेडेकर, युवा सेना तालुकाप्रमुख स्वप्नील शहाणे, विष्णू वखरे, रणजित खिल्लारे, गोपाल चेके, विनोद कोल्हे, छोटू खेडेकर यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना ओम पहाड म्हणाले की, डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या कार्यकाळात सिंदखेड राजा मतदारसंघात पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, पर्यटन व जलसंधारण यासह विविध क्षेत्रांत ऐतिहासिक विकास झाला. त्यांच्या सक्षम नेतृत्वामुळे मतदारसंघाला कोट्यवधी रुपयांची विकासकामे मिळाली असून, हीच प्रेरणा घेऊन युवा पिढी समाजहितासाठी कार्य करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ओम पहाड यांनी पुढे सांगितले की, जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून डॉ. खेडेकर यांची ओळख आहे. भविष्यातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना व मित्र पक्ष अधिक बळकट होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाला उपस्थितांनी सलाम केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *