मेहकर –
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त देऊळगाव माळी, तालुका मेहकर येथे प्रबोधनकारी विचारांचा भव्य जागर आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे पार पडणार आहे.
या निमित्ताने विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, रविवार, दि. 4 जानेवारी 2026 रोजी रात्री 8 वाजता बहुजन विचारांचे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार व गायक ह.भ.प. ज्ञानेश्वर वाबळे महाराज (माऊली) यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम विद्यालयातील समस्त शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच व्यवस्थापन समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, परिसरातील नागरिकांनी या प्रबोधनकारी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे
Users Today : 32