भांडूप :
भांडूप रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी रात्री घडलेल्या बेस्टच्या इलेक्ट्रिक बस अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास बस रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट गर्दीत घुसली. या भीषण अपघातात चार निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून १३ ते १४ जण जखमी झाले आहेत. या घटनेचे थरारक सीसीटीव्ही फुटेज मंगळवारी समोर आले आहे.
स्थानक परिसरात घरी जाण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. काही प्रवासी बससाठी रांगेत उभे होते, तर काही रेल्वे प्रवासानंतर घरी निघाले होते. अशाच वेळी बस रिव्हर्स घेत असताना अचानक वेगाने मागे आली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडले. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला, किंकाळ्या आणि आरडाओरडा सुरू झाला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये बस अनियंत्रितपणे मागे येत नागरिकांना धडक देताना स्पष्ट दिसत आहे. काही जण जीव वाचवण्यात यशस्वी झाले, मात्र काही जण बसच्या चाकाखाली सापडले. बस पुढे जाऊन एका लोखंडी खांबावर आदळल्याने तो खांबही वाकल्याची माहिती आहे.
अपघातानंतर जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचे नेमके कारण, तांत्रिक बिघाड, तसेच चालकाची निष्काळजीपणा किंवा इतर बाबींची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच राज्य सरकारतर्फे मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.भांडूप बस अपघाताचे थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर; चार जणांचा मृत्यू, अनेक जखमी
भांडूप : भांडूप रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी रात्री घडलेल्या बेस्टच्या इलेक्ट्रिक बस अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास बस रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट गर्दीत घुसली. या भीषण अपघातात चार निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून १३ ते १४ जण जखमी झाले आहेत. या घटनेचे थरारक सीसीटीव्ही फुटेज मंगळवारी समोर आले आहे.
स्थानक परिसरात घरी जाण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. काही प्रवासी बससाठी रांगेत उभे होते, तर काही रेल्वे प्रवासानंतर घरी निघाले होते. अशाच वेळी बस रिव्हर्स घेत असताना अचानक वेगाने मागे आली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडले. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला, किंकाळ्या आणि आरडाओरडा सुरू झाला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये बस अनियंत्रितपणे मागे येत नागरिकांना धडक देताना स्पष्ट दिसत आहे. काही जण जीव वाचवण्यात यशस्वी झाले, मात्र काही जण बसच्या चाकाखाली सापडले. बस पुढे जाऊन एका लोखंडी खांबावर आदळल्याने तो खांबही वाकल्याची माहिती आहे.
अपघातानंतर जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचे नेमके कारण, तांत्रिक बिघाड, तसेच चालकाची निष्काळजीपणा किंवा इतर बाबींची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच राज्य सरकारतर्फे मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
Users Today : 36