कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या सहा गोवंशांची मंठा पोलिसांकडून सुटका

KHOZ MASTER
1 Min Read

मंठा प्रतिनिधी | जालना जिल्हा :-
कत्तलीच्या उद्देशाने अवैधरीत्या वाहतूक करण्यात येणाऱ्या सहा गोवंशांची मंठा पोलिसांनी वेळीच कारवाई करत सुटका केली. ही कारवाई बुधवारी रात्री सुमारे ११ वाजता मंठा–उस्वद रस्त्यावरील अंभोरा–शेळके पाटील फाट्याजवळ करण्यात आली. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंठा पोलिसांना बोलेरो पिकअप वाहनातून गोवंशाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी अंभोरा परिसरात नाकाबंदी करून सापळा रचला. संशयास्पद बोलेरो पिकअप वाहन थांबवून झडती घेतली असता, त्यामध्ये सहा गोवंश अतिशय दाटीवाटीने व क्रूरतेने बांधलेले आढळून आले.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वाहन जप्त केले. या प्रकरणी गजानन किसन राठोड (वय ३५) आणि साजिद काशीम कुरेशी (रा. चारठाणा, ता. जिंतूर, जि. परभणी) या दोघांविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुटका करण्यात आलेल्या गोवंशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून पुढील तपास मंठा पोलीस करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *