मेहकर प्रतिनिधी –
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त मेहकर (जि. बुलढाणा) येथील धर्मवीर स्व. दिलीपराव रहाटे शिक्षण बहुउद्देशीय प्रसारक संस्था येथे भव्य व उत्साही वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी परिसरात देशभक्तीचा आणि राष्ट्राभिमानाचा उत्साह दिसून आला.
ध्वजारोहणानंतर संस्थेच्या संकुलातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्गाशी सविस्तर संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित अडचणी, शिक्षकांना येणाऱ्या समस्या तसेच संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजना यावर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना, शिक्षण हा समाजाच्या विकासाचा कणा असून भविष्यातील युवा पिढी देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गणपतराव रहाटे, संचालिका श्रीमती राजश्री जाधव, सौ. मयुरी जाधव, प्राचार्य श्री. लाहोरकर सर, प्राचार्य श्री. प्रताप बोरकर, प्राचार्य श्री. गजानन निकस, संस्थेचे प्रमुख पदाधिकारी, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेहकर : धर्मवीर स्व. दिलीपराव रहाटे शिक्षण संस्थेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
0
9
5
5
4
3
Users Today : 1
Leave a comment