सिंदखेड राजा प्रतिनिधी –
सिंदखेड राजा, दि. २६ – भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सिंदखेड राजा येथे शासकीय थाटात व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ९.१५ वाजता उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या शुभहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. उपस्थित अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी संविधान, लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेप्रती निष्ठा व्यक्त केली. यावेळी नगराध्यक्ष सौरभ तायडे, उपनगराध्यक्ष दीपाली म्हस्के, तहसीलदार अजित दिवटे, महसूल नायब तहसीलदार डॉ. प्रवीण कुमार वराडे, निवासी नायब तहसीलदार प्रांजल पवार, पोलीस ठाणेदार आशिष इंगळे, गटविकास अधिकारी अजित बांगर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक मारुती थोरवे, नायब तहसीलदार नितीन बडे आणि भूमापक प्रकाश शिंदे उपस्थित होते.
याशिवाय ग्राम महसूल अधिकारी विष्णू थोरात, वसुदेव जायभाये, राहुल देशमुख, शिवानंद सानप, गोरखनाथ पवार, कोतवाल आकाश मघाडे, राजू खरात तसेच महसूल विभागातील संजय सोनु, गणेश नागरे, नागेश खरात, गजानन राऊत, भास्कर घुगे यांची उपस्थिती होती. महिला कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने देखील कार्यक्रमास हजेरी लावली.
प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने संविधानाची महत्ता, लोकशाही मूल्ये आणि देशसेवेचा संदेश उपस्थितांना देण्यात आला. शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडलेल्या या शासकीय सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण अनुभवायला मिळाले.
