वाशिम: यशवंतराव चव्हाण इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

KHOZ MASTER
1 Min Read

वाशिम प्रतिनिधी –
वाशिम, दि. २५ – लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी यशवंतराव चव्हाण इंग्लिश प्रायमरी स्कूल (सीबीएसई) येथे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मतदान दिनाचे महत्त्व स्पष्ट करत झाली. यानंतर इयत्ता नववीची विद्यार्थिनी गौरी सपकाळ हिने मतदान शपथ दिली, ज्यात सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे शपथ घेतली. तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी पोस्टर तयार केले, ज्यातून मतदानाचे अधिकार आणि कर्तव्ये प्रभावीपणे मांडण्यात आली.
इतिहास विषयाच्या शिक्षिका रेणुका देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मतदानाच्या ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्वाचे समजावून सांगितले. शाळेचे प्राचार्य डॉ. संजीव कुमार सिंह यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जबाबदार आणि जागरूक नागरिक बनण्याचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचा समारोप इतिहास विषयाचे शिक्षक सतीश बिजवे यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *