मेहकर : पेनटाकळी प्रकल्पाची पाहणी; केंद्रीय मंत्री व माजी आमदारांकडून अभियंत्यांना कडक सूचना

KHOZ MASTER
2 Min Read

मेहकर प्रतिनिधी :
मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पातील कालव्याच्या आरसीसी ट्रफ सिमेंटीकरण कामाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांनी नऊ किलोमीटर पायी फिरत प्रकल्प स्थळी भेट देऊन निरीक्षण केले. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्यामुळे त्यांनी कामातील त्रुटींबाबत अभियंत्यांना कठोर सूचना दिल्या.
प्रकल्पाची पार्श्वभूमी
पहिल्या टप्प्यातील ७२ कोटी रुपयांचे कालवा आरसीसी ट्रक सिमेंटीकरण काम सुरू आहे. कालव्याच्या १ ते ११ किलोमीटर भागातील पूर्वीचे काम तांत्रिकदृष्ट्या चुकीचे झाले होते, ज्यामुळे पाणी पाझरून शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
प्रतापराव जाधव व संजय रायमुलकर यांनी मागील २० वर्षांपासून सातत्याने या प्रकल्पाचा पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तसेच, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ५ कोटी ३४ लाख रुपये वितरित केले गेले.
शेतकऱ्यांच्या मागण्या
नैसर्गिक पाण्याचे योग्य विल्हेवाट लावणे
बांधकामामध्ये अर्धी रेती व ५०% कृषी साहित्य वापरणे
कंत्राटदाराच्या वाहनांमुळे हिवरा आश्रम ते दुधा रस्ता खराब झाल्यामुळे दुरुस्ती करणे
कालव्यामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी अद्ययावत करून नुकसानभरपाई देणे
बैठकीत निर्णय व मार्गदर्शन
प्रतापराव जाधव व संजय रायमुलकर यांनी अभियंत्यांना वरील सर्व बाबींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यावेळी खडक पूर्ण प्रकल्प कार्यकारी अभियंता सपना डावरे, उपविभागीय अभियंता मिलिंद तबागडे, कार्यकारी अभियंता बुलढाणा सुधीर सोळंके, अधीक्षक अभियंता बापूसाहेब गाडे, कंत्राटदार ऋषिकेश देशमुख व शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी या बैठकीत दिलेल्या सूचना आणि आगामी कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *