मेहकर प्रतिनिधी :
मेहकर नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरात विविध सकारात्मक उपक्रम सुरू केले आहेत. सुरुवातीला त्यांनी ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ उपक्रम राबविला, तर त्यानंतर ५ हजार महिलांच्या उपस्थितीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम शिवसेना उवाठाच्यावतीने यशस्वीपणे पार पडला.
विद्यार्थ्यांसाठी कला व सांस्कृतिक कार्यक्रम
नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्टेज उपलब्ध करून दिला. यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य वाव मिळाला. कार्यक्रमात कोणत्या शाळेचा कितवा क्रमांक आला, यापेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे ठरले.
विशेष कार्यक्रम – बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी
नगराध्यक्ष गारोळे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करून शिवसेना पक्षाला बळकटी देण्याचे काम केले. हा भव्यदिव्य उपक्रम बुलढाणा जिल्ह्यात मेहकर व्यतिरिक्त कुठेही झाला नसल्याचे वृत्त आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.
शिक्षक व पालकांचा प्रतिसाद
नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या सकारात्मक उपक्रमामुळे शाळा व शिक्षक वर्गासह पालक वर्गदेखील आनंदित झाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले आणि शहरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
नगराध्यक्षांचे मत
नगराध्यक्ष किशोर गारोळे म्हणाले, “नगराध्यक्ष पदाचा लाभ जनतेच्या हितासाठी करायचा आहे. विविध सकारात्मक कार्यक्रमांचा हा फक्त आरंभीचा टप्पा आहे. विकासकामांच्या बाबतीत मेहकर शहर नेहमीच अग्रणी राहणार आहे.”
मेहकर : नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या सकारात्मक उपक्रमांमुळे शहरात उत्साहपूर्ण वातावरण
0
9
7
2
0
1
Users Today : 31
Leave a comment