मेहकर प्रतिनिधी :
शेगाव–पंढरपूर पालखी मार्गावरील गोमेधरजवळील पुलावर निर्माण झालेल्या धोकादायक खड्ड्यामुळे यापूर्वी अनेक अपघात घडले असून काहींना जीवही गमवावा लागला होता. या गंभीर समस्येची दखल घेत माजी आमदार संजय रायमुलकर यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे.
गोमेधरजवळील पुलावर खोलगट भाग निर्माण झाल्याने वेगात येणाऱ्या वाहनांना तो लक्षात येत नव्हता. त्यामुळे अनेक वेळा वाहने उसळून अपघात घडले होते. यामध्ये अनेक जण जखमी झाले तर काहींना प्राण गमवावे लागले. ११ जानेवारी रोजी वैजापूर येथील वाहन अपघातात सात जण जखमी झाले होते. विशेष म्हणजे माजी आमदार संजय रायमुलकर यांचे वाहन त्या अपघातग्रस्त वाहनामागेच असल्याने त्यांनी तात्काळ मदतकार्य केले होते.
या घटनेनंतर माजी आमदार संजय रायमुलकर यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून गोमेधर पुलावरील धोकादायक खड्डा तातडीने बुजवण्याची मागणी केली होती. त्यांनी वारंवार होणाऱ्या अपघातांकडे लक्ष वेधत त्वरित उपाययोजना करण्याची सूचना केली होती.
त्यानुसार आज संबंधित विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करून त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला असून संभाव्य अपघात टळणार आहेत.
या कामामुळे माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
मेहकर : शेगाव–पंढरपूर पालखी मार्गावरील खड्डा बुजवला माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नांना यश
0
9
4
5
7
6
Users Today : 13
Leave a comment