मेहकरमध्ये अजितदादा पवार यांच्या स्मृतिदिनी सर्वपक्षीय शोकसभा

Khozmaster
2 Min Read

मेहकर प्रतिनिधी :

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अ.पा. गट) चे अध्यक्ष आदरणीय अजित दादा पवार यांचे दिनांक २८ जानेवारी २०२६ रोज जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबई वरून बारामती येथे विमानाने जात असताना दुर्दैवी अपघात झाला, ज्यात दादांसह त्यांच्या सहकार्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या आत्म्याला देवाच्या चरणी शांती लाभो ही प्रार्थना व्यक्त करण्यासाठी दिनांक २९ जानेवारी २०२६ रोज नेहकर येथील स्वातंत्र्य मैदानात सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली.
शोकसभेचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीधर पाटील आणि तालुका अध्यक्ष मजानन सावल यांनी केले. या वेळी मेहकर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सजाय रायमूलकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शामभाऊ उमाळकर, माजी नगराध्यक्ष कासम भाई जवळी, तहसीलदार निलेश मडके, नगराध्यक्ष किशोर गारोळे, कृ.उ.बा. समिती अध्यक्ष माधवराव जाधव, भीम शक्तीचे नेते भाई सुखदाणे, जिल्हा काँग्रेस नेते अनंतराव वानखेडे, तसेच अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी अजित दादा पवार यांचे जीवनचरित्र व कार्य यावर प्रकाश टाकला. नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, अजय वैताने, सुधीर आरोळकर, किशोर ढेपले, विशाल शिरपूरकर, संतोष राणे, तसेच शिवसेना गट नेते प्रेश सात्या वाळूकर, काँग्रेस पक्षाचे नगर सेवक मो. अलीम लाहेर, निलेश सोमण, अख्तर कुरेशी, संजय ढाकाके, तसेच अनेक पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते.
शोकसभेचे संचालन सिद्धेश्वर पवार आणि युनुस पटेल यांनी केले. शेवटी अजित दादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

0 9 4 5 7 6
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *