मेहकर प्रतिनिधी :
समृद्धी महामार्गावर चालकाला डुलकी लागल्याने भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला आहे.
मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील समृद्धी महामार्गावरील चॅनेल नंबर २६८, नागपूर कॉरिडॉरवर मुंबईहून नागपूरकडे जाणारा ट्रक (क्रमांक डब्ल्यूबी २३ ई ६४१७) चालकाला अचानक डुलकी लागल्याने रस्त्याखाली जाऊन उलटला.
या अपघातात ट्रकचालक सुनील कुमार मोरया हा किरकोळ जखमी झाला. महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चालकास ट्रकच्या केबिनमधून बाहेर काढून उपचारासाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, अपघातग्रस्त ट्रकमधील मालाची चोरी होऊ नये, यासाठी डोणगाव पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला होता. या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मेहकर : डुलकी लागल्याने भरधाव ट्रक उलटला; चालक किरकोळ जखमी
0
9
4
5
7
6
Users Today : 13
Leave a comment