विद्या खरात यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Khozmaster
1 Min Read

सिंदखेड राजा प्रतिनिधी :

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव लेंडी येथे प्रजासत्ताक दिनी जिजाऊ-सावित्री कर्मयोगिनी पुरस्कार प्राप्त सहाय्यक शिक्षिका विद्या दत्तात्रय खरात यांना गजानन महाराज सांस्कृतिक आश्रम बीबी, तालुका लोणार यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी पुरस्कार गजानन महाराज सांस्कृतिक आश्रमाचे उपाध्यक्ष गोविंद राजाराम टेके आणि त्यांच्या पत्नी आशा गोविंदराव टेके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रणवीर इंगळे, सरपंच अंबादास लबडे, सदस्य आणि गावकरी उपस्थित होते.
चार महिन्यापूर्वी रुजू झालेल्या विद्या खरात यांनी शाळेचा कायापालट केलेला असून, त्याबद्दल गावकऱ्यांनी व व्यवस्थापन समितीने समाधान व्यक्त केले. या प्रसंगी रवींद्र मापारी, एकनाथ मेहेत्रे, शिवहरी कायंदे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष टेके, भाऊसाहेब टेके, अरुण गायके, श्रीमंत गायके, लक्ष्मण गायके, फटपुरे, सतीश लबडे आदींनी परिश्रम घेतले.

0 9 4 9 7 2
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *