काटगाव येथे धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचार सभा

Khozmaster
1 Min Read

तुळजापूर प्रतिनिधी :

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ काल तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे प्रचार सभा उत्साहात पार पडली.
या सभेत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कॉंग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.
यावेळी धाराशिव जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. धीरज कदम पाटील, प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर, प्रदेश सचिव श्री. अमर खानापुरे, तालुकाध्यक्ष श्री. रामचंद्र आलुरे यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत विकासाभिमुख विचार मांडत मतदारांना संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले.

0 9 4 9 7 2
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *