देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने विश्वकर्मा यांची जयंती साजरी

Khozmaster
1 Min Read

देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा , सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय सिव्हिल काॅलनी देऊळगाव राजा तसेच जनसेवा सामाजिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन आठवडी बाजार येथे विश्वकर्मा यांची जयंती साजरी करण्यात आली, भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी प्रा.विजयकुमार रायमल, श्री.शांतिलालजी निरफळे ,प्रा.विनायकराव कुळकर्णी यांनी आपल्या भाषणातून भगवान श्री.विश्वकर्मा यांच्या जीवनकार्यचे सविस्तर वर्णन केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बळीराम मापारी मामा, सचिव गोविंदराव बोरकर अरुण सपाटे , रमेश नरोडे , मधुकरराव धुळे , पंडितराव पाथरकर , गणेश ज़ंजाळकर, सोहम जंजाळकर, बागुल महेश शांताराम,प्रा.अशोक डोईफोडे , घनश्यामजी भंडारे, देविदास भालेराव , रामदास भोलनकर, बाळू सोनुने, भास्करराव दाभाडकर,नितीन खोरगडे, राजेश जंवजाळ, सचिन घेवंदे, रामभाऊ रायमल,उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा विजय रायमल यांनी केले तर आभार प्रदर्शन . गोविंदराव बोरकर यांनी केले.राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

0 9 4 9 7 2
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *