खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे आघाडीची प्रचार सभा उत्साहात संपन्न

Khozmaster
1 Min Read

खुलताबाद प्रतिनिधी :
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या आघाडीतील सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेत जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडीतील उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख धोरणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष श्री. किरण डोनगावकर, सौ. रेखाताई सोमीनाथ गायकवाड, श्री. सागर आखीव काटकर, श्री. सोहेल बशीर पटेल यांच्यासह आघाडीतील सर्व पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 9 7 2
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *