मानव सुरक्षा सेवा ट्रस्टतर्फे वृद्धांना ब्लँकेट व फळांचे वाटप; पदाधिकारी विविध पुरस्कारांनी सन्मानित

Khozmaster
2 Min Read

मेहकर : मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या वतीने वृद्धाश्रमाला भेट देऊन गोरगरीब व वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना ब्लँकेट व फळांचे वितरण करण्यात आले. याचबरोबर ट्रस्टच्या विविध पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा तसेच राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारांचे वितरण मोठ्या उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भारतमाता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, पंडित जवाहरलाल नेहरू, स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, राष्ट्रपिता महात्मा गांधी व संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे हे होते. प्रमुख मान्यवर म्हणून संस्थापक सचिव अरुण पांडव, संस्थापक कोषाध्यक्ष मा. संगीताताई साबणकर, संस्थापक सहसचिव गोविंद अग्रवाल, महाराष्ट्र राज्य सल्लागार तथा प्रमुख पाहुणे महेश पवार, महाराष्ट्र अध्यक्ष रामेश्वर कापडे, महिला अध्यक्षा वंदनाताई म्हैस, उपाध्यक्षा राणीताई पवार, कोषाध्यक्ष चक्रपाणी चाचर, मीडिया प्रमुख समाधान पदमने, संघटक आरिफ खान, विदर्भ उपाध्यक्ष गजानन निळे यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे सामाजिक कार्य, उद्दिष्टे व भावी वाटचाल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित स्नेहसंमेलन व पुरस्कार सोहळा अंजनी येथील हॉटेल परिवार येथे आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला. सन २०२५ मध्ये निःस्वार्थ सामाजिक कार्य व मानवसेवेत योगदान देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र निरीक्षक फिरदोस खान, विदर्भ अध्यक्ष सुनील गंगाखेडे, विदर्भ कार्याध्यक्ष किशोर भूतकर, विदर्भ सहसचिव दत्तात्रय वाघमारे, रोशनी कानोडजे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण लांडे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील, बुलढाणा उपाध्यक्ष डॉ. अशोक पऱ्हाड, जळगाव जिल्हाध्यक्ष विकास पाटील, चिखली तालुका सचिव राजेंद्र अवचार, मेहकर तालुका उपाध्यक्ष पंकज मिश्रा यांच्यासह राज्यातील विविध जिल्हे व तालुक्यांमधील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेहकर येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना ब्लँकेट व फळांचे वितरण करण्यात आले. तसेच मा. अजय उमाळकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांनी या सेवाभावी उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य म्हणून ११ हजार रुपयांचे योगदान दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. महाराष्ट्र मीडिया प्रमुख समाधान पदमने व इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

0 9 4 5 7 6
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *