डोणगांव : दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा संजीवनी सेवाभावी परिवाराच्या वतीने ग्रामीण भागातील पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी संजीवनी दर्पण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी राजुरकर मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे.
यामध्ये बुलढाणा जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोदबाप्पु देशमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार, तालुकाध्यक्ष गजानन चनेवार, तसेच जेष्ठ पत्रकार रफीक कुरेशी, दत्ता उमाळे, सतीश खुरद, पुरुषोत्तम लोखंडे, कैलास राऊत यांच्यासह तालुक्यातील पत्रकार मंडळी उपस्थित राहणार आहेत.
स्व. डॉ. जगदीश बिडवई यांच्या स्मृतीर्थ दिल्या जाणाऱ्या या संजीवनी दर्पण पुरस्काराने जेष्ठ पत्रकार अशोकराव वानखेडे, गजानन वसंतराव देशमुख, संपादक रवींद्र रामभाऊ वाघ, संपादक शेख सादीक कुरेशी, संपादक निलेश रमेशराव काळे, नवल जयसिंग राठोड यांचा सन्मान मान्यवर मंडळींच्या हस्ते केला जाणार आहे.
प्रतिष्ठेचा आणि प्रेरणादायी समजला जाणारा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार बांधवांना सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक व्यक्त केले जात आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला मेहकर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवानी उपस्थित राहावे, असे आवाहन हमीद मुल्लाजी, सुरेश फिसके, गणेश पळसकर, सुरेंद्र सिंह चव्हाण आणि संजीवनी सेवाभावी परिवाराचे अध्यक्ष डॉ. गजानन उल्हामाले यांनी केले आहे.
Users Today : 0