देऊळगाव महीत विद्युत शॉक लागून परिचराचा दुर्दैवी मृत्यू

Khozmaster
1 Min Read

देऊळगाव मही, दि. ३१ (प्रतिनिधी) – स्थानिक छत्रपती चौक परिसरात सुरू असलेल्या बांधकामावर संतोष गंगाराम आरमाळ (वय ६२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते घराच्या नवीन जागेच्या बांधकामावर सकाळी पाणी मारताना विद्युत मेन लाइनच्या तारेला शॉक बसल्याने तिसऱ्या मजल्यावरून कोसळले.

संतोष आरमाळ हे शिवणी आरमाळ येथील रहिवासी असून ते लक्ष्मीबाई माध्यमिक आश्रम शाळेत प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत होते. सद्यस्थितीत ते देऊळगाव मही येथे राहत होते. अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जालना येथील कलावती हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

संतोष आरमाळ हे शांत, मनमिळावू आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

या घटनेमुळे बांधकाम परिसरातील विद्युत सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांनी अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

0 9 4 9 6 9
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *