अर्थसंकल्प 2026 : काय स्वस्त, काय महाग?

Khozmaster
1 Min Read

नवी दिल्ली : सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक वस्तूंच्या किमती प्रामुख्याने जीएसटी कौन्सिल ठरवत असते. अर्थसंकल्पात प्रामुख्याने आयात शुल्कातील बदलांचा परिणाम दिसून येतो. यंदाच्या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.
कर्करोगावरील 17 जीवनरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द करण्यात आली असून, दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी लागणारी काही औषधे व विशेष खाद्यपदार्थही करमुक्त करण्यात आले आहेत. यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मायक्रोवेव्ह ओव्हनच्या काही सुट्या भागांवरील ड्युटी कमी केल्याने येत्या काळात मायक्रोवेव्ह स्वस्त होऊ शकतात. तसेच ईव्ही बॅटरी व सोलर पॅनल निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल करमुक्त केल्याने हरित ऊर्जेला चालना मिळणार आहे.
सी-फूड, बूट व कपड्यांच्या निर्यातीसाठी कच्च्या मालावर सवलत दिल्याने या वस्तूंच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. विमान उद्योगात सुट्या भागांवरील कस्टम ड्युटी हटवल्याने हवाई प्रवास आणि विमानांची देखभाल स्वस्त होऊ शकते.
परदेशातून वैयक्तिक वापरासाठी मागवलेल्या वस्तूंवरील कर 20 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आला आहे. तसेच बॅगेज क्लिअरन्सचे नियम सुलभ होणार आहेत.
दरम्यान, बहुतांश वस्तूंच्या किमती जीएसटी कौन्सिल ठरवत असून, सध्या 5% आणि 18% असे दोनच जीएसटी स्लॅब लागू आहेत. यामुळे तूप, पनीरपासून कार व एसीपर्यंत अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत.

0 9 4 9 6 9
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *