शिम प्रतिनिधी : ग्रामविकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांच्या निष्क्रियतेमुळे गावपातळीवरील विकास कामकाजात गंभीर अडथळे निर्माण झाले आहेत. ग्रामसेवक हे गावातील प्रशासनाचे थेट प्रतिनिधी असून, विकास योजना, लाभार्थी योजना, दाखले, नोंदी आणि दैनंदिन कामकाजासाठी ठराविक वेळेत कार्यालयात हजेरी देणे बंधनकारक आहे.
तथापि, मंगरुळपीर तालुक्यात अनेक ठिकाणी हजेरी रजिस्टरमध्ये उपस्थित, पण प्रत्यक्षात गावात अनुपस्थित असल्याची धक्कादायक स्थिती पाहायला मिळते. ऑनलाईन दाखल्यांसाठी हेल्प, योजना लाभ, हजेरी, अचानक विलंब, तक्रारींची दुर्लक्ष – या सर्व गैरहजेरीच्या प्रकरणांमुळे ग्रामीण प्रशासनाचे उद्दिष्ट ठप्प झाले आहे.
ग्रामविकासासाठी योजनांची पूर्तता केवळ कागदोपत्री हजेरीवर अवलंबून नाही; जनतेशी विश्वास ठेवून सेवा देणे ही मुख्य जबाबदारी आहे. निष्क्रिय ग्रामसेवकांमुळे नागरिकांना सेवा मिळण्यास विलंब होत आहे, विकास प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत आणि गावकऱ्यांचा विश्वासघात होत आहे.
सर्वसामान्य नागरिक आणि स्थानिक प्रशासन आता जवाबदारी ठरवून आणि मनमानी कर्मचाऱ्यांवर अंकुश लावत ग्रामविकास सुधारण्याची मागणी करत आहेत.
वाशिम : ग्रामसेवकांची निष्क्रियता – ग्रामविकासाचा कणा मोडकळीस
0
9
4
9
6
9
Users Today : 0
Leave a comment