मलकापूर पांग्रा: किंडरगार्टन प्री-स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बालसृष्टीचे कलागुण आणि सामाजिक संदेश

Khozmaster
1 Min Read

मलकापूर पांग्रा प्रतिनिधी : स्थानिक किंडरगार्टन प्री-स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाने शेंदुर्जन वासियांचे लक्ष वेधले. राम मंदिर परिसरात आयोजित या दिमाखदार सोहळ्यास रांगोळी, रंगीबेरंगी पताके आणि दीपप्रज्वलनाने सजावट केली होती. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दिवंगत स्व. अजित दादा पवार यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पणाने झाली.
सोहळ्यात लहान विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत केवळ मनोरंजनच नव्हे, तर सामाजिक संदेशही दिला:
स्वच्छता: ‘कचरा गाडीवाला आला’ या गाण्यावर नृत्य करून गाव स्वच्छ ठेवण्याचे आवाहन.
पर्यावरण रक्षण: वृक्षतोड थांबवून निसर्गाचा समतोल राखण्याबाबत सादरीकरण.
देशभक्ती: देशभक्तीपर गीतांनी प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण.
कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष परशरामजी जोशी, उपाध्यक्ष प्रशांत देशमुख, उपसरपंच नकुल शिंगणे, शिक्षक, सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्य जया जोशी यांनी प्रास्ताविक करताना सांगितले, “काळानुसार शाळेचे स्वरूप बदलले, शिक्षकांची संख्या वाढली, परंतु पालकांचा शाळेवर असलेला अढळ विश्वास तसूभरही बदलला नाही. ग्रामीण विद्यार्थ्यांना शहराच्या दर्जाचे शिक्षण अल्प फीमध्ये देणे हेच आमचे ध्येय आहे.”
कार्यक्रमात सत्कार मूर्ती नंदकिशोर शिंगणे यांनी शाळेच्या कौतुकास्पद प्रगतीवर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांची प्रशंसा केली.

0 9 4 9 6 9
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *