लोणार: किनगाव जट्टूतील महिला मजूरांना भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

Khozmaster
1 Min Read

लोणार प्रतिनिधी : १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता किनगाव जट्टू येथील महिला मजूरांना भीषण अपघात झाला. मजूर महिलांनी शेतकामासाठी तीनचाकी अँटोने सरस्वती येथील शेतकऱ्याच्या शेताकडे जात असताना, मारोती स्विफ्ट कार (एम. एच.४३ ए.एफ. ५८२१) अँटोला जोरदार धडक दिली.
या अपघातात अँटोमधील जरीनाबी आयुब शाहा आणि रंजना परमेशवर कासतोडे या दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित महिलांचा गंभीर जखमी अवस्थेत लोणार ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्याची शक्यता आहे.
प्राथमिक तपासात समोर आले आहे की अँटोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. भरधाव गतीने आलेल्या स्विफ्ट कार चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावल्यामुळे हा अपघात घडला. धडकेत अँटो रस्त्याच्या कडेला उलटला आणि कारही मोठ्या नुकसानात आली.
घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी महिलांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले. अपघातातील कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय इंगळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
जखमींमध्ये कल्पना विठ्ठल दमदाडे, अलका मधुकर शेवाळे, राधाबाई गजू गायकवाड, लक्ष्मी बबन करवंदे, शांताबाई परशराम शेळके, चंद्रभागाबाई जगन नागरे या महिलांचा समावेश आहे. त्यांच्या प्रकृतीवर उपचार सुरू आहेत आणि काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते.
या भीषण घटनेने परिसरात हळहळ पसरली असून, मृत महिलेच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

0 9 4 9 6 9
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *