मुंब्रा प्रतिनिधी : २२ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुंब्रातून तीन महिन्याची चिमुकली अपहरण करण्यात आली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.
अपहरणानंतर तपासात निष्पन्न झाले की, चिमुकलीला पातूर तालुक्यातील खेट्री पोलिस स्टेशन हद्दीतील खेट्री येथे नेले गेले. घटनेची गंभीर दखल घेत मुंब्रा आणि खेट्री पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ३० जानेवारी रोजी खेट्रीत छापा टाकून आरोपी खैरून्निसा आणि तिचा पती मोहम्मद मुजीब गुलाब यांना अटक केली. ताब्यात घेतलेल्या चिमुकलीला सुरक्षितपणे तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.
मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणासाठी चार पथक तयार केले, १६०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून अखेर आरोपींपर्यंत पोहोचले. पालकांनी आपल्या लेकीला सुरक्षित पाहून पोलिसांचे आभार मानले.
या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंब्रातून अपहरण केलेली तीन महिन्यांची चिमुकली खेट्रीतून सुरक्षित ताब्यात
0
9
4
9
6
9
Users Today : 0
Leave a comment