जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड कॉलेजमध्ये दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

KHOZ MASTER
1 Min Read

मेहकर प्रतिनिधी : जीवन अमूल्य आहे; वाहतूक नियमांचे पालन करा! अशा संदेशासह बुलढाणा पोलीस विभाग व मेहकर पोलीस उपविभाग ने ३१ जानेवारी रोजी मेहकर शहरात दुचाकी रॅली काढून जनजागृती अभियान राबविले.
उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, वाहन चालवताना नेहमी वाहनाचा वेग मर्यादित ठेवा, हेल्मेट वापरा, कमी वयाच्या मुलांना वाहन चालवू देऊ नका आणि वाहनाची सर्व कागदपत्रे जवळ ठेवा.
संतोष खाडे म्हणाले, “अलीकडच्या काळात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढत आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहतूक पोलीस यांच्याकडून दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करा.”
रॅलीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, मेहकरचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, तसेच सर्व पोलीस कर्मचारी सहभागी झाले.
पोलीस विभागाने या रॅलीद्वारे वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असून, भविष्यात रस्त्यावर सुरक्षिततेसाठी जागरूकता वाढविणे हे अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

0 9 7 2 6 6
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *