राहेरी व दुसरबीड येथील खडकपूर्णा नदीवरील रेती घाटावर पर्यावरणीय प्रश्न

KHOZ MASTER
1 Min Read

राहेरी बु. प्रतिनिधी : राहेरी व दुसरबीड गावांमधून वाहणारी खडकपूर्णा नदी ही नेहमीच रेती बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. या वर्षाकरिता नदीपत्रातील रीती घाटाचा अर्ज दिला गेला होता, परंतु काठाच्या काही शासन निकषांची पूर्तता न झाल्याचे असूनही, संबंधित ठेकेदाराने तहसीलदार सिंधखेडराजा यांच्याकडून हिरवा कंदील घेऊन २८ जानेवारीपासून रात्रंदिवस जेसीबी, पोकलेन व बोटच्या साह्याने रेती उपसा सुरू केला आहे.
स्थानिकांनी पर्यावरण परमिशन, जेसीबी व पोकलेन वापराची परवानगी आणि रात्रीच्या वेळेस चालवण्याची परवानगी याबाबत तहसीलदारांशी दूरध्वनीवरून विचारणा केली, मात्र त्यांच्याकडून ठोस उत्तर मिळाले नाही. तहसीलदार ने “आज सांगतो, उद्या सांगतो” असे उत्तर देऊन वेळ फुकट घालवला आहे, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.
स्थानीयांचे म्हणणे आहे की, रेती घाटावर सतत बोट व पोकलेन वापरामुळे ३० ते ३५ फुटापर्यंत रेती उपसा होण्याची शक्यता आहे. लेखी व तोंडी अनेकदा माहिती देऊनही तहसीलदारांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
स्थानिकांची मागणी आहे की, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी या घाटाची पाहणी करून रेती घाट कायमचं बंद करावा, जेणेकरून पर्यावरणाचा क्षतीपासून बचाव होईल.

0 9 7 2 6 6
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *