विहिरीत बुडून शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

Khozmaster
1 Min Read

मंगरुळ नवघरे, दि. २ (प्रतिनिधी)
हराळखेड येथे विहिरीत पाण्यात बुडून एका ५२ वर्षीय शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

किसन भगवान येवले (वय ५२) असे मृत शिक्षकाचे नाव असून, याबाबत नंदकिशोर येवले यांनी तक्रार दिली आहे. रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी किसन येवले हे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. मात्र ते घरी न परतल्याने शोध घेण्यात आला असता, पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला.

विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

किसन येवले हे चिखली तालुक्यातील वैरागड येथील जिल्हा उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात वडील, एक भाऊ, एक मुलगी, एक मुलगा तसेच मोठा येवले परिवार आहे.

0 9 4 9 6 6
Users Today : 138
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *