दाताळा, दि. २ (प्रतिनिधी)
दाताळा येथून जवळ असलेल्या माळेगाव जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत संत थोर समाजसुधारक संत रविदास महाराज यांची जयंती १ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कडू हिवाळे यांच्या हस्ते संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन व पूजन करण्यात आले. त्यानंतर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी चर्मकार समाज बांधवांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक बारसु तायडे, संजय तायडे, निलेश तायडे व रवींद्र दांडगे यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून मानवंदना दिली.
मुख्याध्यापक आर. पी. सुरडकर यांनीही संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांच्या विचारांचे स्मरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कडू हिवाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय तायडे यांनी मानले.
या कार्यक्रमास कपिल हिवाळे, अतुल इंगळे, सक्षम तायडे, निखिलकुमार हिवाळे, रवींद्र दांडगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 138