खामगाव : खामगाव ग्रामीण ग्रामपंचायत कार्यालयात रविवारी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सामाजिक समता, बंधुता व मानवतेचा संदेश देणाऱ्या गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच हर्षा अजय दाते होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सचिव कैलास शेगोकार, लक्ष्मण ठोंबरे, डॉ. सुरडकर, वासुदेव चिम, सुनिल काकडे, गजानन वानखडे, सुरेंद्र पुरोहित, प्रकाश पाटील, विजय भागवतकर, अमोल गोरे, अजित पानझाडे, पृथुराज गवई, सतीश गायकवाड, रवींद्र चव्हाण, अभिलेख मोरे, नितेश बावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात गुरु रविदास महाराजांच्या विचारांचे महत्त्व विशद करत समाजात समानता, न्याय व सद्भावना निर्माण करण्यासाठी त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला खामगाव ग्रामीण ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 138