शेतशिवारात बिबट्याचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

KHOZ MASTER
1 Min Read

खामगाव : तालुक्यातील शिरजगाव देशमुख, खुटपुरी व घाटपुरी या गावांच्या लगत असलेल्या शेतशिवारात बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून विशेषतः रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सकाळच्या सुमारास शेतात गेलेल्या नागरिकांना बिबट्याचे पायांचे ठसे आढळून आले असून, काही ठिकाणी जनावरांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच शेतात जाणाऱ्या महिला व लहान मुलांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

या परिसरात ऊस, हरभरा, गहू आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड असून दाट पिकांमुळे बिबट्याला लपण्यासाठी अनुकूल वातावरण मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वनविभागाने तातडीने दखल घेऊन गस्त वाढवावी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

0 9 7 2 6 6
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *