सोनू चव्हाण गोरसेना संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडले

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :
बुलढाणा येथील सामाजिक कार्यकर्ते सोनू चव्हाण यांची गोरसिकवाडी-गोरसेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत २४ जानेवारी रोजी तुळजापूर तालुक्यातील धाराशिव येथे हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
सोनू चव्हाण यांची सामाजिक क्षेत्रातील सक्रियता, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेला विश्वास यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदी निवडण्यात आले. संघटनेच्या विस्तारासाठी, राज्यांतील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी आणि समाजहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
सोनू चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि युवक प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असून, गोरसेना माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहेत. प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताना त्यांनी संघटनेचा विस्तार करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे आणि समाजाच्या प्रश्नांना न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

0 9 7 2 6 6
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *