मेहकरच्या विश्वकर्मा मंदिरात प्रभु विश्वकर्मा प्रगटदिन महोत्सव संपन्न; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

KHOZ MASTER
1 Min Read

मेहकर प्रतिनिधी :
मेहकर येथील लोखंडी पायऱ्या परिसरातील विश्वकर्मा मंदिरात प्रभु विश्वकर्मा प्रगटदिन महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. महोत्सवाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.
सकाळी ५ वाजता विश्वकर्मा महिला भजनी मंडळाच्या वतीने काकाडा भजन पार पडले. सकाळी ८ वाजता ज्येष्ठ सुतार कारागीर मधुकर सुरुशे यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण झाले. त्यानंतर प्रभु विश्वकर्माच्या मुर्तीचा अभिषेक व महापूजा रमेश राऊत व एकनाथ मानवतकर यांच्या हस्ते करण्यात आला. समीर महाराज मोहरील यांनी प्रभु विश्वकर्मा कथासार वाचन केले व महाआरती संपन्न झाली.
संध्याकाळी हरिपाठ व रात्री जय हनुमान भजनी मंडळ पळसखेड जहांगिर यांचा भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला. १ फेब्रुवारीला महाप्रसादाचे वाटप आ. डॉ. संजय रायमूलकर, नगराध्यक्ष किशोर गारोळे, नगरसेवक नितीन तुपे, मोहन जाधव, महेश रिंढे, अमर घोडे, हभप गोपाल पितळे, विशाल भिसे, हभप जयदेव पितळे, गोपाल गायकवाड, हभप भागवत भिसे व सुतार समाजातील ज्येष्ठ कारागीर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वकर्मा प्रगटदिन महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली, तर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

0 9 7 2 6 6
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *