मलकापूर नजीक दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एक ठार, एक गंभीर जखमी

KHOZ MASTER
1 Min Read

मलकापूर प्रतिनिधी :
२ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता मलकापूर-डिलक्स फर्निचर मार्गावर राजूर तर्फे जात असलेल्या शेख जावेद शेख हनीफ (वय ३५) यांच्या दुचाकीचा (MH 28- के 4395) निंबारी फाट्या नजीक राजवीर पेट्रोल पंपासमोर दाताळाकडून येत असलेल्या दुसऱ्या दुचाकीशी (MH 19- सीएस 602) समोरासमोर धडक झाली.
धडकेत शेख जावेद जागीच ठार झाले, तर दुसऱ्या दुचाकीवरील सागर सुधीर झांबरे (वय ३६, रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव) गंभीर जखमी झाला. जखमी व्यक्तीला मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, अॅड. हरीश रावळ, नगरसेवक जाकीर मेमन व इतरांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे.

0 9 7 2 6 6
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *