बुलढाणा प्रतिनिधी :
बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, बुलढाणा येथील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी सांगितले की, “रस्त्यावरील शिस्त ही केवळ दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी नसून, घरी आपली सुरक्षित वाट पाहणाऱ्या कुटुंबीयांसाठी आहे.” विशेषतः तरुण पिढीने दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा, वाहनाचा वेग मर्यादेत ठेवावा व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान सुरक्षित वाहनचालना, हेल्मेटचा वापर, सीट बेल्ट लावणे व वेगमर्यादेचे पालन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून व जनजागृतीपर फलकांच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. “शिस्तबद्ध वाहतूक हीच सुरक्षित प्रवासाची गुरुकिल्ली” असा संदेश देत विद्यार्थ्यांनी समाजासमोर एक सकारात्मक आदर्श मांडला.
या रस्ता सुरक्षा अभियान व रॅलीमध्ये महाविद्यालयाचे प्रा. बी. व्ही. नरवाडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. एस. काटकर, प्रा. पंकज राणे, प्रा. अजिंक्य कुहिरे, प्रा. हर्षल देशपांडे, प्रा. अंकुश गाडेकर, प्रा. सुजित पाटील, प्रा. पावन जगताप, योगेश काकडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
बुलढाणा पोलीस दलातर्फे रस्ता सुरक्षा अभियान
0
9
4
9
6
6
Users Today : 138
Leave a comment