मेहकर प्रतिनिधी :
सर्व जीव एकाच मातीतून निर्माण झाले असून सर्वांचा निर्माता एकच आहे. त्यामुळे सर्वांमध्ये समानता आहे; इथे कोणीही लहान-मोठा नाही. मेहनतीलाच प्रभूभक्ती मानणारा माणूसच जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होतो, असा विचार मांडणारे संत शिरोमणी रविदास महाराज होते. सुमारे ६०० वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले विचार आजही समाजासाठी तितकेच उपयुक्त व मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक हिरालाल डोंगरे यांनी केले.
येथील एम.ई.एस. विद्यालयात १ फेब्रुवारी २०२६ रोजी संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डोंगरे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. उपस्थितांनी संत रविदास महाराजांच्या कार्याला अभिवादन केले.
यानंतर संत रविदास नगर येथील समाज भवनातही संत रविदास महाराजांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास भावलाल डोंगरे, प्रताप बिबे, भीमराव पठे, रमेश उतपुरे, राजू पहारे, महेंद्र गोवेकर, जसराज पढे, विक्रांत जोरेवार, डॉ. राम पठे, गणेश चंद्रे, जुगराज पठे, राहुल ठाकरे, दिलीप माहोरे, कैलास पढे, दिलीप दुर्योधन, वैभव पठे, नागेश पढे, तोष्णील पठे, दर्शन पढे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मेहनतीलाच प्रभुशक्ती समजणारे संत रविदास होते : डोंगरे
0
9
2
6
4
4
Users Today : 11
Leave a comment