चिखलीच्या सौरभ गाने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक

Khozmaster
1 Min Read

चिखली प्रतिनिधी :
चिखली येथील उदयोन्मुख बुद्धिबळपटू व श्रीकृष्णनगर येथील रहिवासी राजेश गाने यांचा मुलगा सौरभ गाने याने अमरावती येथे झालेल्या बिलो–१७०० प्राईड रेटिंग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळविले. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल १ फेब्रुवारी रोजी समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे सौरभचा सत्कार करण्यात आला.
अमरावती येथे २० ते २५ जानेवारी २०२६ या कालावधीत बिलो–१७०० आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशातील १३ राज्यांतील ३७१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. सौरभ गाने याने १४०० ते १५०० रेटिंग गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक मिळवून ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस प्राप्त केले.
या यशाबद्दल समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे सौरभच्या निवासस्थानी जाऊन त्याला प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रेणुकादास मुळे, सचिव संजय भालेराव, कोषाध्यक्ष सतीश बिडकर, गजानन कुळकर्णी, भिकू लोळगे, सत्य कुटे यांच्यासह सौरभचे आई-वडील व बहीण उपस्थित होते.

0 9 2 6 4 1
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *