मलकापूर प्रतिनिधी :
रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने ३१ जानेवारी २०२६ रोजी मलकापूर शहरात रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ अंतर्गत मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ७.३० ते ९.०० या वेळेत पार पडलेल्या या रॅलीची सुरुवात मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथून करण्यात आली. ही रॅली मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्राम दाताळा येथे पोहोचून सांगता झाली. रॅलीमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ही रॅली उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश महल्ले, मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गिरी, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पेंदोर यांच्यासह दोन्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी हेल्मेटचा वापर, वेगमर्यादेचे पालन आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे किती आवश्यक आहे, हे या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना पटवून देण्यात आले. रॅलीदरम्यान “रस्ता सुरक्षा – जीवन रक्षा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
मलकापूरात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मोटारसायकल रॅली
0
9
2
6
4
1
Users Today : 8
Leave a comment