खामगाव तालुक्यातील शेतशिवारात बिबट्याचा वावर;

Khozmaster
1 Min Read

शेतकऱ्यांमध्ये भीती
खामगाव प्रतिनिधी :
खामगाव तालुक्यातील शिरजगाव, देशमुख, खुटपुरी व घाटपुरी गावांच्या शेतशिवारात बिबट्याचा वावर आढळून आला आहे, ज्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून विशेषतः रात्रीच्या वेळी बिबट्याचे हालचाली वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सकाळच्या सुमारास शेतात गेलेल्या नागरिकांना बिबट्याचे पायाचे ठसे दिसून आले, तर काही ठिकाणी जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडल्याची माहिती मिळाली. या परिसरात ऊस, हरभरा, गहू यासारखी पिके मोठ्या प्रमाणावर लागवडलेली असून, दाट पिकांमुळे बिबट्याला लपण्यासाठी अनुकूल वातावरण मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच शेतात जाणाऱ्या महिला व लहान मुलांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

0 9 4 9 6 2
Users Today : 134
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *