देऊळगाव राजा/सिंदखेड राजा, दि. २ (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थिकलश दर्शनाचा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यात ३ ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये भाविकांसाठी दर्शनाची सोय करण्यात आली असून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, नगराध्यक्ष सौरभ तायडे, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हासह संपर्कप्रमुख छगनराव मेहेत्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विष्णू मेहत्रे, शरद पवार राष्ट्रवादीचे नेते विजय तायडे यांनी केले आहे.
याप्रसंगी सिंदखेडराजा येथील विश्रामगृहात २ फेब्रुवारी रोजी नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीला अजित पवार राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस भगवान सातपुते, शिवसेना विधानसभा प्रमुख शिवप्रसाद ठाकरे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख अतिश तायडे, शिंदे शिवसेना नगरपरिषद गटनेते अॅड. संदीप मेहेत्रे, शरद पवार राष्ट्रवादी नगर परिषद गटनेते दिलीप आढाव, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अशोक मेहेत्रे, भाजप नगरसेवक संतोष मेहेत्रे, अजित पवार राष्ट्रवादी शहर अध्यक्ष वैभव मीनासे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
अस्थिकलश दर्शनाचा कार्यक्रम सिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्मस्थान परिसरातून सुरू होणार असून, लोणार, मेहकर, खामगाव, शेगाव, वरवट बकाल, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर, मोताळा, बुलढाणा, चिखली व देऊळगाव राजा अशा विविध ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
अस्थिकलश दर्शनासाठी प्रमुख मुक्कामाचे ठिकाणे :
-
सिंदखेड राजा – जिजाऊ जन्मस्थान समोर
-
लोणार – विनायक कापड केंद्र चौक
-
मेहकर – अशोक हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका
-
खामगाव – महात्मा गांधी पुतळ्याजवळ
-
शेगाव – छत्रपती शिवाजी महाराज चौक
-
वरवट बकाल (ता. संग्रामपूर) – कॉटन मार्केट
-
जळगाव जामोद – दुर्गा चौक
-
नांदुरा – छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ
-
मलकापूर – हनुमान चौक
-
मोताळा – मोताळा फाटा
-
बुलढाणा – गांधी भवन
-
चिखली – डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका
-
देऊळगाव राजा – बस स्टँड चौक
गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता संत चोखामेळा सागर (खडकपूर्णा) जलाशयात विधीवत अस्थिविसर्जन होणार आहे.
या श्रद्धापूर्ण कार्यक्रमास सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार तसेच समाजातील विविध घटक व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Users Today : 8