बुलढाणा, दि. ४ (प्रतिनिधी)
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ तसेच जल जीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर जवळपास दोन दशकांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यभरातील बाराशेहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ४ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे
जिल्हा व तालुका स्तरावर हे कर्मचारी ग्रामपंचायतींमध्ये योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, क्षेत्रीय तपासणी, लाभार्थ्यांशी समन्वय, ऑनलाईन नोंदी, तसेच अहवाल सादरीकरणाची जबाबदारी पार पाडतात. यासोबतच जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर नियोजन व देखरेखीचे महत्त्वाचे कार्यही या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येते.
मात्र चार महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे घरभाडे, मुलांचे शिक्षण, तसेच वैद्यकीय खर्च भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने ४ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी काम थांबवून आपल्या-आपल्या कार्यालयासमोर निदर्शने केली. मानधन तातडीने अदा करण्यात यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला आहे.
पगार थकला; स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
0
9
4
9
6
2
Users Today : 134
Leave a comment