जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार

KHOZ MASTER
1 Min Read

शेगाव, दि. ४ (प्रतिनिधी)
संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणीला फूस लावून लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शेगाव येथे नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सोनाळा (ता. संग्रामपूर) येथील १९ वर्षीय तरुणी २ फेब्रुवारी २०२६ रोजी शेगाव येथे दर्शनासाठी आली होती. यावेळी आरोपी आकाश सोनाजी भामद्रे (रा. सोनाळा) याने तिला मंदिर परिसरात गाठले. “मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे,” असे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपीने दुपारी १ ते १:३० च्या सुमारास मंदिर परिसरातील एका लॉजवर तरुणीला नेले. तेथे त्याने तरुणीला जबरदस्तीने बाहुपाशात ओढून तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याचा आरोप आहे. याबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.
मात्र, आरोपीच्या धमकीला भीक न घालता पीडित तरुणीने शेगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी ३ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ७४, ३५१ (२) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील करीत आहेत.

0 9 7 2 6 6
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *