माजी विद्यार्थ्यांची २० वर्षांनंतर भरली शाळा

KHOZ MASTER
1 Min Read

संग्रामपूर, दि. ४ (प्रतिनिधी)*

संग्रामपूर येथील पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा तब्बल २० वर्षांनंतर स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्रभारी मुख्याध्यापक श्रीरंग ढोकणे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्रभारी मुख्याध्यापिका चित्राताई राजनकर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, सरस्वती माता व संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान करत सर्व शिक्षकांचा सत्कार केला.

मेळाव्यात अनिलसिंग चव्हाण यांनी प्रास्ताविकातून शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत जुने व आताचे अनुभव कथन केले. यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगत शिक्षकांनी दिलेले चांगले आचार-विचार, संस्कार व शिक्षण यामुळेच आज आम्ही घडलो, असे मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी शाळेसाठी स्पीकर भेट देण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षक मोरणकर, राठोड, इंगळे, मारोडे, मेहरकर यांच्यासह शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सूत्रसंचालन प्रवीण वानखडे यांनी केले, तर आभार विजय आकोटकर यांनी मानले

0 9 7 2 6 6
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *