स्काऊट-गाईड मेळाव्यात सहकार विद्या मंदिरचे वर्चस्व

Khozmaster
1 Min Read

मोताळा, दि. ४ (प्रतिनिधी)*

येथील सहकार विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड मेळाव्यात उल्लेखनीय कामगिरी करत शहरी विभागात घवघवीत यश संपादन केले. या मेळाव्यात शाळेच्या गाईड पथकाने (मुली) शहरी विभागात प्रथम क्रमांक पटकावला, तर स्काऊट पथकाने (मुले) तृतीय क्रमांक मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

हा जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड मेळावा राष्ट्रीय सैनिकी स्कूल, कोलवड (ता. बुलढाणा) येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान उत्साहात पार पडला. मेळाव्यात जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.

शहरी विभागातील स्काऊट विभागात (मुले) सहकार विद्यामंदिरच्या पथकाने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर तृतीय क्रमांक मिळवला. तर गाईड विभागात (मुली) शिस्त, धाडस आणि विविध प्रात्यक्षिकांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला.

या तीन दिवसीय मेळाव्यात विद्यार्थ्यांनी तंबू निवास, गाठी मारणे, प्रथमोपचार, साहसी खेळ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

या यशाबद्दल बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, बुलढाणा अर्बन चॅरिटेबलच्या अध्यक्षा कोमल झंवर, मुख्याध्यापक अभिजीत देशमुख तसेच शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुकाचा वर्षाव केला.

विद्यार्थ्यांना शाळेचे स्काऊट मास्टर व गाईड कॅप्टन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

0 9 4 9 5 7
Users Today : 129
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *