संतश्रेष्ठ रविदास महाराजांचे विचार दिशादर्शक : तहसीलदार पाटील

KHOZ MASTER
1 Min Read

संग्रामपूर, दि. ४ (प्रतिनिधी)

संतश्रेष्ठ रविदास महाराज यांनी धर्म, कर्म, देश व समाजासाठी दिलेले विचार आजही समाज व देशासाठी दिशादर्शक ठरत असल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले.

संग्रामपूर शहरातील चर्मकार समाज बांधवांच्या वतीने संत रविदास महाराज जयंतीनिमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार प्रशांत पाटील व माजी सभापती पांडुरंग इंगळे यांच्या हस्ते संत रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी माजी सभापती पांडुरंग इंगळे यांच्यासह अन्य मान्यवरांनी संतश्रेष्ठ रविदास महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.

यानंतर सायंकाळी शहरातून संत शिरोमणी रविदास महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरणही करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रकाश डाखोडे, प्रा. देविदास भटकर, विशाल बावस्कर, भारत बावस्कर, सौरभ बावस्कर, विको भटकर, बाळकृष्ण बावस्कर, रमेश कळसकार, हरीश भटकर, अभिषेक डाखोडे, रवी गवई, अमोल बावस्कर, सुहास डाखोडे, नीलेश बावस्कर, अंकुश बावस्कर यांच्यासह बहुसंख्य चर्मकार समाज बांधव उपस्थित होते.

0 9 7 2 6 6
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *