शिवसाई विद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Khozmaster
2 Min Read

मासरूळ, दि. ४ (प्रतिनिधी)*

स्थानिक शिवसाई ज्ञानपीठ व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी छावा चित्रपटातील दृश्य सादर करून सर्वांनाच भावनिक केले. तसेच भारतीय सैनिकांच्या जीवनावर आधारित नृत्यप्रस्तुती, शेतकरी नृत्य, भारूड, कीर्तन, बतावणी, एकांकिका, गायन आदी कार्यक्रमांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.

कार्यक्रमात महिला पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतील विजेत्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसाई परिवाराचे अध्यक्ष डी. एस. लहाने होते. उद्घाटक म्हणून धाड ठाणेदार प्रताप भोस उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये शिवसाई पतसंस्थेचे अध्यक्ष डी. बी. नरवाडे, मुख्याध्यापक प्रमोद मोहरकर, मुख्याध्यापिका संगीता नरवाडे, कवी किशन कापरे, मधुकर महाले, संदीप काटोले, शेषराव सावळे, दिलीप सिनकर, मधुकर सिनकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन लांडे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण सिनकर, तंटामुक्ती अध्यक्ष बाळू सपकाळ, शरद देशमुख, भगवान पवार, संजय देशमुख, किरण उगले, पंडित सावळे, प्रकाश लांडे, किरण देशमुख आदी मान्यवरांचा समावेश होता.

सूत्रसंचालन प्रा. सुरेश आस्वार व प्रा. विनोद गवते यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य अरुण भगवान गुळवे यांनी मांडले. अध्यक्षीय भाषणात डी. एस. लहाने यांनी विधवांना समाजामध्ये मान-सन्मान देण्याचे आवाहन केले.

आभार प्रदर्शन संस्थेच्या वतीने डी. बी. नरवाडे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक सुखदेव नरवाडे, कैलास सिनकर, प्रा. उत्तम कांबळे, प्रा. हरिदास देवकर, प्रतीक जाधव, योगेश लोखंडे, कोमल लांडे, मनिषा वानरे, प्रीती जाधव, वैष्णवी खोलगडे, अंजना सपकाळ, किरण सिनकर, विठ्ठल दळवी, सागर भागवत, विष्णू बोडखे, संजय कळसकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

0 9 4 9 4 2
Users Today : 114
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *