व्यंकटेश महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा उत्साहात

Khozmaster
2 Min Read

देऊळगाव राजा, दि. ४ (प्रतिनिधी)

स्थानिक व्यंकटेश महाविद्यालय, भास्करराव शिंगणे महाविद्यालय व सिंधुताई जाधव महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पाणथळ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजनात व्यंकटेश महाविद्यालयाच्या एनसीसी व प्राणीशास्त्र विभागाने पुढाकार घेतला.

२ फेब्रुवारी रोजी दरवर्षी जागतिक वेटलँड डे साजरा केला जातो. यावर्षी हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. व्ही. गोरे हे होते.

यावेळी प्रा. डॉ. जी. आर. परिहार यांनी पाणथळ भूमी संवर्धन व जैवविविधतेच्या सद्यस्थितीवर सविस्तर व अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. तर दुसरे व्याख्याते कर्नल ओमेश शुक्ला यांनी एनसीसी व पर्यावरण संरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.

अतिथींचा परिचय डॉ. आर. आर. खवल व डॉ. ओंकार तनपुरे यांनी करून दिला. डॉ. एम. आर. तांदळे यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन अर्जुन वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डी. एम. शिंबरे यांनी मानले.

कार्यक्रमांतर्गत आयोजित पोस्टर सादरीकरण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पाणथळ भूमी संरक्षण, पर्यावरण संतुलन व जैवविविधता या विषयांवर विविध पोस्टर्स सादर करून जनजागृती केली. या स्पर्धेसाठी प्रा. डी. एम. शिंबरे, डॉ. अरविंद कानवटे व डॉ. अमोल जाधव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

स्पर्धेत *प्रथम क्रमांक अजय सांगळे, **द्वितीय क्रमांक विनय बोंडे* तर *तृतीय क्रमांक अर्जुन वाघमारे* यांनी पटकावला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव तसेच व्यवस्थापन प्रतिनिधी छाया राजे जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

0 9 4 9 4 2
Users Today : 114
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *